पायथ्याशी पसरलेलं जग,
दिवाळी वाटावी इतकं झगमगत!
दिवसभर कामात बुडून सूर्य बुडायला लागला की कॅफे, बार भरवणारे लोकांचे जत्थे,
इथे आठलाच बऱ्याच गोष्टी बंद होत असल्याने होणारी चहल-पहल,
जगातून कुठल्या कुठल्या देशातून अमेरिकन ड्रीम जगायला आलेली सगळ्या रंगाची ही रंगीबेरंगी माणसं,
दुकांनानी सजलेल्या रस्त्यांवरून येणारी इंग्लिश गाण्यांची धून,
नाताळ जवळ येतोय म्हणून नव्या नवरीसारखं नटलेलं शहर
आणि या सगळ्याहून वर शांत डोंगऱ्याच्या दगडी कपारीत,
नजरेसमोर खेळण्यांसारखी उडणारी विमानं अन् जमिनीला भिडलेलं आकाश पाहात,
दूरच्या एका देशातून आलेले अन् इवल्याश्या नजरेत अमेरिका खंडाच्या आकाराएवढं कुतूहल घेऊन हे सारं सामावून घेऊ पाहणारे आपण
Comments
Post a Comment