आमचं घर शिफ्टिंगचं काम संथ गतीने चालू आहे. मागच्या काही महिन्यात आम्ही इतकी धावपळ करतोय की आता शिफ्टिंगचं काम आरामात हळूहळू करतोय. तर सगळ्यात आधी प्रथेप्रमाणे नवीन घरी पुस्तकं गेली. आज पुस्तकांचा शेवटचा लॉट तिकडे नेल्यावर रिकाम्या हॉलमध्ये दोघे बसलो होतो. पुस्तकांकडे प्रेमाने नजर फिरवताना, मला लक्षात आलं की ही पुस्तकं मी वेगवेगळ्या देशात, राज्यात, गावात खरेदी केलेली आहेत. मग त्यातले लेखक कवी पाहताना त्यांच्यात असलेलं साधर्म्य आणि फरक दिसू लागले. वैचारिक, आर्थिक, सामाजिक, भौगोलिक, राजकीय सगळ्याच बाबतीत वेगवेगळी मते असलेली ही बुद्धिवान माणसं! काही पुस्तकं मला इथल्या मित्रमंडळींनी भेट दिलेली आहेत तर काही अनोळखी पुस्तकप्रेमी लोकांनी दिलेली आहेत. सगळ्याच विषयांवरची पुस्तकं आहेत. काही लेखक कवी हयात आहेत तर बरेचसे या जगात आता नाहीत. हा विचार डोक्यात घोळत असतानाच जय निघूयात म्हणाला आणि आम्ही दरवाजा बंद करून निघू लागलो. बागेकडे असलेल्या खिडकीतून उन्हाची तिरीप पुस्तकांच्या गठ्ठ्यांवर पडली होती. ते चित्र विहंगम दिसत होतं म्हणून का काय माहिती नाही, पण मला वाटलं, आम्ही इथू...
काल एका वेबसिरीजमध्ये या माझ्या लाडक्या जागेचं दर्शन झालं आणि आम्ही यावर्षीच्या भारतभेटीत इथे जाऊन आल्याची आठवण जागी झाली. मुंबई शहराची माझ्यावर विशेष माया आहे असं मला वाटतं. अमेरिकेत येण्याआधी मी दोन कंपन्यांमध्ये काम केलं. दोन्ही कंपन्यांनी ट्रेनिंगसाठी मुंबईला बोलावलेलं. जवळपास सहा-सात महिने मी मुंबईत होते. माझ्यावर विलक्षण गारूड असणाऱ्या शहरांपैकी एक शहर ही मायानगरी आहे. मी पुस्तकांतून या शहराबद्दल भरभरून वाचलेलं! इथे राहणाऱ्या प्रत्येक वर्गाच्या आयुष्याबद्दल माझा थोडा अभ्यास होता. त्यामुळे मी मुंबईत राहायला आले तेंव्हा विस्फारलेल्या डोळ्यांमध्ये मुंबई भरभरून साठवत होते. कुठल्याश्या पुस्तकात मी ताज टी हाऊसबद्दल वाचलं होतं. शनिवारी किंवा रविवारी बांद्र्यात चालत चालत भटकणे हे माझं रूटीन होतं. त्यामुळे तिथल्या कित्येक अफलातून जागा मला माहित आहेत. ताज टी हाऊसला मी पहिल्यांदा गेले तेंव्हा आत शिरायच्या आधीच त्या जुन्या पारशी घरात वसलेल्या या टीहाऊसच्या प्रेमात पडले होते. आत गेल्यावर प्रत्येक कोपऱ्यात पसरलेलं शास्त्रीय संगीत पाहून आपण चुकीच्या गोष्टींच्या प्रेमात पडत नाही याची खात्र...