ज - माझ्या आवडत्या देवांत महादेव सगळ्यात
वर आहेत.
प्र - का रे?
ज - शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे. तिला काही
झालं तर ब्रम्हांड उलथं पालथं करून टाकतात.
वैराग्यवस्था फक्त तिच्यासाठी टाकून गृहस्थ
होतात. मला त्यांचं प्रेम माझ्या खूप जवळचं
वाटतं.
प्र - तू तसाच आहेस न म्हणून!
ज - ओहोहो ! बिग वर्ड मई बिग वर्ड !!
प्र - अरे खरंच की.
प्रेम करणं तर झालंच पण
व्यक्तिशः पण शिवतत्व जागृत आहे तुझ्यात.
जगाच्या टीका वा कौतुकाची पर्वा नसलेला.
आपल्या स्पेसमध्ये ध्यानस्थ असल्यासारखा
आपलं काम करत राहणारा.
ना आपलं कर्तृत्व कुणाला सांगणारा
ना कधी कौतुकाची अपेक्षा करणारा,
किंचित गर्व नसणारा.
अतिशय कंटेंट असलेला माझा शिव!
ज - त्याचं कारण माझ्या आजूबाजूला आहे.
माझी शक्ती मला इतकं दणदणीत साजरं करते की
मला कधी दुसऱ्याच्या कौतुकाची गरजच पडत नाही.
तिने माझा हात पकडला की जगात काहीही करू
शकेन एवढा आत्मविश्वास आपोआप येतो.
जगाचे लाख शब्द आणि मईचा एक शब्द
असा रेशो आहे.
त्यामुळे मी शांत, समाधानी, कंटेंट
राहणं साहजिक आहे.
देवीतत्वासोबत राहतो मी,
कुणाच्या टीकेची काय पर्वा मला!
परत सांगतो, शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे.
प्र- याहून सुंदर शिवरात्र कशी साजरी करायची.
आपल्या आतल्या शिव- शक्ती तत्वाची ओळख
असणे, त्यापुढे आदराने मान झुकणे,
एकमेकाशिवाय असलेलं अपूर्णत्व जाणून
सहवासाविषयी कृतज्ञ असणे हीच तर खरी वंदना.
ज - अगदी खरं! तरी थोड़ी साबुदाण्याची खिचडी
खाऊन शिवरात्र संपूर्ण संपन्न होईलसं वाटतंय.
प्र - हाहाहा!!!! अरे संसार संसार !!
- प्रज्ञा
#short_love_story
Comments
Post a Comment