तर! मी मागे म्हणाले त्याप्रमाणे माझा पहिला विमानप्रवास होता आणि माझ्या लाडक्या नवऱ्याने बायकोला पहिल्या विमान प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून सगळ्या प्रवासाची प्रिमीयम क्लासची तिकीटं काढली होती. आमच्या सोबतचे सहप्रवासी आणि आम्हाला दिली जाणारी सर्विस जरा वेगळी होती. विमानात टर्ब्यूलन्स नावाचा प्रकार होतो ज्यात विमान जरा खालीवर झाल्यासारखं वाटतं. ते अगदीच नॉर्मल असतं. पण मी खिडकीतून ते विमान असं तिरकं तिरकं होताना पाहिलं आणि म्हणलं झालं आता! सदेह जाणार वर! मी - जय पायलटनी लेक्चर्स बंक केलेली दिसत आहेत! ह्याला खेळण्यातलं वाटतंय का काय विमान??? पाहिजे तसा वाकडा तिकडा उडवतोय रे! जय - अगं काही नाही होत. हे होत रहातं गं! मी - नको बाबा ! हा नक्की झोपेत वगैरे नाहीये ना?? जय - नाही गं! आमचा हा संवाद चालू असतानाच आमच्या बाजूच्या रांगेत एक मध्यमवयीन अमेरिकन बाई बसली होती, जिला सतत केबिन क्रू येऊन भेटत होते. तिला सतत खायला आणून देत होते. एकदा काही तर आणून “This is from us Ma’m” असं म्हणून गेले. आम्हाला काही कळेना. की या बाईला ही स्पेशल ट्रीटमेंट आणि आदर दिला जातोय म्हणजे नक्की कुणी...