रोज कुठून तरी कुणाच्या तरी मृत्यूच्या बातम्या येणं इतकं नियमित झालं आहे की त्या घटनेतून मुव ऑन होऊन पुढे जाता जाता आपण मरणाबद्दलची किंवा एकंदरितच माणसाच्या आयुष्याबद्दलची संवेदना हरवून चाललो आहोत की काय असं वाटायला लागलं आहे. एक मैत्रीण परवा सहज बोलून गेली, “सोशल मिडिया उघडला की जगाच्या पाठीवर कुणी तरी मृत्यूमुखी पडले याची बातमी असतेच. आधी खूप वाईट वाटायचं आता मी सहज स्क्रोल करते इतक्या बातम्या दिसत राहतात!” मला धक्काच बसला. आधी असे अपघात, अकाली मृत्यु घडत नसतील का तर घडत होते पण आपल्यापर्यंत त्या बातम्या सहज पोहोचायच्या नाहीत. वर्तमानपत्रात, फार तर कुणी सेलिब्रिटी अथवा त्या शहरांत अशी काही घटना घडली तर त्याबद्दल छापून येण्याइतकी जागा मर्यादित असे. जगभरातल्या मृत्यूवार्ता छापून येण्याचा स्कोपच नव्हता. दूसरं माध्यम म्हणजे टिव्ही. तो प्रत्येकाच्या घरी असेल का हा दूसरा मुद्दा. त्यात त्यावर डेलीसोप पाहिले जातात की बातम्या हा मुद्दा आला. टिव्हीवरच्या बातम्यांनाही वेळेचं बंधन होतं. आतासारखी टिआरपीची जीवघेणी स्पर्धा नव्हती. आता मात्र तसं राहिलं नाहीये. वेळेचं, काळाचं, जागेचं ...
आजवर आम्हा दाम्पत्याला दोनदा मिशेलिन स्टार रेस्टोरेंटमध्ये खाण्याचा योग आला. मजा अशी की दरवेळी खाताना किंवा खाऊन झाल्यावर आम्हाला ते रेस्टोरेंट मिशेलिन स्टार प्राप्त आहे हे कळले आहे. पहिला अनुभव इटलीत घेतला आणि दुसरा सॅन फ्रान्सिस्कोत! पहिलं रेस्टॉरेंट इतकं ऑथेंटीक इटालियन होतं की तिथल्या कुणाला इंग्लिशही येत नव्हतं. तो अनुभव नंतर आज हा सॅन फ्रान्सिस्कोमधील! एक तर ह्या शहरात अप्रतिम चवीच्या पदार्थांची रेलचेल आहे. त्यात हे भारतीय पदार्थांचं रेस्टॉरेंट आणि त्याला मिशेलिन स्टार!! किती सुरेख गोष्ट! तर! सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आमच्या हॉटेलजवळ पाचच मिनीटांवर हे रेस्टॉरेंट होतं. तिथे फिल्टर कॉफी मिळते हे कळलं आणि तिकडे निघालो. बाहेरून आतील रेस्टोरेंटचा अंदाज येत नव्हता पण आत गेलो तर एक सुरेख सजवलेली स्पेस होती. तिथे बसून नीट निरखल्यावर कळलं की कोपऱ्या-कोपऱ्यामध्ये दक्षिण भारताच्या खुणा सांगणार्या वस्तू चित्रे सजवली होती. ते मॉडर्न आणि पारंपरिक मिश्रण इतकं बेमालूम जमलं होतं की ते रेस्टोरेंट नेमकं कुठलं कळत नव्हतं. आमचा पुढचा दिवस आखलेला होता त्यामुळे जागा नाही तर बार चेअर चालेल म्हणून बार ...