रात्रीचा दुसरा प्रहर झाला, शेजारी झोपलेल्या अनयाच्या अंगावर लख्ख चंद्रप्रकाश पडला होता.पण तो वळलेला.एवढ्यातच त्या कुशीवर वळलेला तिचा अनय! हक्काचा,जगाला ओरडून सांगता येईल असा तिचा अनय! त्याच्या मनात कुठे तरी गाठ बसलेली.त्यानं आजवर तिला शब्दांनी कधी बोलून दाखवलं न्हवत.पण त्याच्या कुठल्याही कृतीत आजकाल ती न्हवती. तिच्यातल्या बायकोनं त्याच्या केसांवरून हात फिरवला.रुसून झोपलेल्या त्याच्या शांतचेहऱ्याकडे बघून तिचे डोळे गच्च भरले.चांदण्यांच्या लख्ख प्रकाशात तिला पटकन काही जाणवलं, ती उठली, उठण्याआधी पायातले जाड घुंगरू तिनं अलगद काढून ठेवलेआणि ती निघाली.भरधाव वेगानं!चंद्राच्या प्रकाशात चमकणारी यमुना बघुन तिचं मन भरून आलं. ती काठाशी पोहोचली.कृष्ण आणखी यायचा होता… राधा-कृष्ण! जगात असणाऱ्या विविध प्रेमांमध्ये सर्वोच्च आणि दुर्मिळ असणार अशारीरीक आत्म्याच प्रेम! त्याला कुठला स्पर्श न्हवता की कसली हाव न्हवती, कसली अपेक्षा न्हवती की कसली देवाणघेवाण न्हवती, त्याला न कोणत्या नात्याचा बंध होता ना कोणती भाषा होती. बरोबर आणि चूक यापलीकडल्या जगातली ती भावना, ते जग जिथे आत्म्याचा आत्म्याशी संवाद घडायचा. आणि ...