Skip to main content

Posts

पाहिलंय मी तिला

पाहिलंय मी तिला नैवेद्याकडे घेत असलेला सवयीचा हात मागे घेताना पाहिलंय मी तिला मळवट भरलेल्या देवीसमोर कोपऱ्यात उभं राहून थरथरत हात जोडताना पाहिलंय मी तिला केसांमधल्या गजऱ्याच्या रिकाम्या जागेवरून हात फिरवताना पाहिलंय मी तिला हिरव्याकंच बांगड्याच्यामधून उठून जाताना पाहिलंय मी तिला हळदीकुंकू चालू असलेल्या घरासमोरून भराभर चालत जाताना पाहिलंय मी तिला रिकाम्या पडलेल्या ओटीच्या पदराची स्वतःशीच गाठ बांधताना पाहिलंय मी तिला हार घातलेल्या फोटोकडे रात्र रात्र बघत आसवं गाळताना पाहिलंय मी तिला लक्ष्मी यायची म्हणून अडगळीत लपताना पाहिलंय मी तिला मंगलकार्यातील हजेरी टाळताना पाहिलंय मी तिला जोडवी नसलेल्या पायांनी हळू हळू पावलं टाकताना पाहिलंय मी तिला काळ्या मण्यांच्या त्या गळ्यातल्याऐवजी काळ्या दोऱ्यांची माळ घालताना पाहिलंय मी तिला वर्षानुवर्षे तिची पूजा चालत असलेल्या देवाला अचानक तिच्या हातचं काहीच चालत नसताना पाहिलंय मी तिला पलंगाच्या त्या रिकाम्या बाजूकडे रागानं बघताना पाहिलंय मी तिला हजारो उखाणे येत असूनही उसनं हसू आणून गप्प बसताना पाहिलंय मी तिला वडाच्या पारावरच्या दोऱ्या घेऊन फिरणाऱ्या बायका निर्...

सांग आता प्रभा मोठी कोणाची?

पहाटेच्या सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबरच ते दोन तेजस्वी डोळे उघडले. त्या वातावरणातील तेज सूर्याचं की त्या दोन डोळ्यांचं असा प्रश्न पडावा इतके ते सुंदर,मोहक,टपोरे धारदार नेत्र.... ती उठली... ज्या पायात गुलामीची, पारतंत्र्याची दोर बांधली होती, त्या पायातले घुंगरू वाजले. ज्या हातांवर अन्यायाचे वळ उमटले होते, ते तिनं तोड्यानी,पाटल्यानी, बांगडयांनी झाकून घेतले. प्रत्येकवेळी संतापल्यावर फुरफुरणारे तिचे नाजूक बाहु,जे वेळोवेळी बळांनी शांत केले गेले होते, त्यावर तिने बाजूबंद चढवले. आवाज दाबून टाकलेल्या त्या गळ्यावर तिने ठुशी घातली. स्वतःच्याही मनाची राणी नसणाऱ्या तिने त्याखाली राणीहार घातला. ज्याच्याविरुध्द संतापाची,अन्यायाची आग छातीत जळत होती ,त्या छातीवर त्याच्या नावाचं भरभक्कम मंगळसूत्र चढवलं. ज्याचं सौंदर्य तिच्यासाठी शाप ठरलं होतं, त्या कम्बरेवर तिनं कंबरपट्टा घातला. जिच्या भाळी भविष्य लिहायचा हक्क खुद्द तिच्या सटवाईला देखील न्हवता, त्यावर तिनं कुंकू रेखलं. डोळ्यातील वेदनेच्या, वेदनेनी सांडू पाहणाऱ्या अश्रूंच्या निषेधार्थ तिनं काळ काजळ घातलं. सगळी आसवं गोळा करून त्यांचा निर्धाराने गजरा माळ...

अथांग

खूप दिवसांचा बोलवत होता म्हटलं जाऊन यावं अथांग विशाल असलेलं त्याचंही मन जरा राखावं । मला पाहून खुश झाला,गडगडाट करीत हसला हसून हसून कसा पुरता हिरवा निळा होऊन गेला । म्हणाला माझ्यावर लिहिणार वगैरे असशील तर आधीच सांग तुझ्यासाठी सोपा करेन कुणाला न सापडणारा माझा थांग । मला शांत शांत बघून तोही झाला अंतर्मुख जरा म्हणाला धून ऐकशील का थोडी, वाहवू का थंडगार वारा । म्हणालीस तर पाण्यालाही सांगतो थोडं खळखळतं संगीत द्यायला पानांची सळसळ तर केंव्हाचीच तयार होऊन बसलीये साथीला । या सगळ्याचा परिणाम म्हणून माझंच मन खदखदून आलं पोटातलं दुःख कसं मी कसोशीने ओठावरचं थांबवलं । त्यावर तिरकस हसत म्हणाला रडायचं तर रडून घे खुशाल आता तुझ्या जगातल्या लपवाछपवीच्या इथे नकोस मारू बाता । ना जाणो कित्येकांची मन ठेवलीत मी नीट राखून तुझ्याही मनाचा मोती ठेवेन की एखाद्या शिंपल्यात झाकून । त्या निरव शांततेत माझ्या हुंदक्याचा आवाज घुमला । दुःखाचा पूल तुटून रडण्याचा आवाज त्या आभाळाला भिडला । किती वेळ होऊन गेला याची मोजदाद न्हवती माझं मन मोकळं होईपर्यंत शांतता त्यानंही राखली होती । हलकेच विचारलं त्यानं आता कसं वाटतंय? ओझ्याने भार...

भूक

  भरून गेलं होतं आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी खूप दिवसांनी दाटून आलेलं डोळ्यांमधलं पाणी । एक देह पडला होता खरा त्या काळ्या ढगांखाली कित्येक हळहळत होती तर कैक म्हणाली बाई सुटली । पार कोलमडून एक मात्र तिथं आकांत करत होती त्या निपचित देहानं पडली होती तिची ती माय होती । पोरीच्या देहावरल्या भाजक्या खुणा बघून ह्रदय तिचं जळत होतं 'चुकून जळाली, त्यानंच जाळली' असं काहीबाही कानावर पडत होतं । सवाष्ण गेली म्हणून मळवट गच्च भरलेला तिचा लाल कुंकवानी कोपऱ्यात एक बसलेला नशेत झिंगलेला त्या कुंकवाचा धनी । दरवाज्याआड एक भेदरलेलं पिल्लू घाबरून उभं होत भीषण जळालेल्या त्या आईनामक देहाकडे त्याला कुणी जाऊ देत न्हवतं । सगळे तिला 'उठ की ग' म्हणून रडतायेत हे त्यानं टिपलं होत तरी ती का उठत नाही ह्याच कोडं त्याला पडलं होतं । अचानक काहीतरी सुचलं होत, रडून लाल झालेल्या चेहऱ्यावर हास्याच चांदणं पसरलं होत । कृष्णविवराच रहस्य जणू त्यानं शोधलं होत आईकडे धावत एक पाऊल पडलं होतं । चुटक्या त्यानं वाजवल्या, क्षणभर खुदकन हसला पटकन पळत जाऊन आजीपाशी बसला । आजीला म्हणाला ' मी सांगतो ना ग की तिला चटकन कसं उठवायचं, त...

शब्द

जिथे जिथे माझे आवाज थांबले, तिथे तिथे शब्द कागदावर उमटायला लागले. रात्रीच्या किर्रर्र शांततेत माझ्या शाईचा समुद्र खवळून उठेल, खदखद करेल, विराटी हास्य दाखवेल, पण मन मोकळं होईल, जे मेंदूला सुचतय ते व्यक्त केलं जाईल. प्रचंड आवडतं मला शब्दांशी खेळणं. खूप इमानदार असतात ते... जे म्हणायचं आहे ते नेमकं पकडतात. मनात झालेली शब्दांची गर्दी कागदावर उतरवली की विलक्षण समाधान मिळतं. जे म्हणायचं आहे ते नेमक्या ओळीत साधलं गेलं की मिळणारं सुख अपार आहे. कित्येकदा मनातल्या शब्दांनी कागदाचा पत्ता विचारला, मी नाही दाखवला तो शाईवाटेने जाणारा रस्ता... या गद्दारीसाठी क्षमस्व शब्दांनो!! मी त्या प्रत्येक शब्दावर प्रेम करते, ज्यांनी जगायला जगवायला शिकवलं. - तुमची ऋणी प्र. ज्ञा. जोशी

बाप आहे मी तिचा!

  (Written for the strongest bond of all those great fathers in the world and their darling daughters) "To my शेर" आधीच सांगतो, "बाबा तू रडतोयेस का रे?"असं विचारायचं नाहीस.अवघड जात ग तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर देणं.खरं सांगू ,मला खूप हेवा वाटतो निशादचा...माझी बाहुलीसाठी हट्ट करणारी छोटी परी ज्यावेळी खऱ्या आयुष्यात चालत्या बोलत्या बाहुल्याच्या प्रेमात पडली, खूप भीती वाटली ग...असं कसं माझ्या बाळाला दुसऱ्याच्या हाती सोपवायचं? तुझी आई टोमणा मारून गेली,"मी न्हवते आले तुमच्यासोबत घर मागे सोडून?" तू पहिल्यांदा पाऊल टाकलस ना तो फोटो बघत बसलेलो.तू सप्तपदीमध्ये पहिलं पाऊल टाकलस ना तेंव्हाही वाटलं.आत्ता-आत्ता तर माझा हात सोडून चालायला शिकलेलं पिल्लू आज आयुष्यात खूप मोठं पाऊल टाकतय! बापाचं काळीज आहे ना ग,बोलून दाखवता येत नाही....पण काळजी वाटते.लग्नाच्या पंगतीत निशाद तुला घास भरवत होते,सगळे फोटो काढत होते, हसत होते,मी मात्र कोपऱ्यात उभा होतो.थोडासा खट्टू होऊनच...तुला पहिला दात आलेला त्यावेळी तुला 'गम गम भा...

मैफिल

                               त्या असंख्य अखंडित स्वरांची बरसात माझ्या रोमारोमावर व्हावी । तार तिथे छेडली जावी अन कंपनांनी लय माझ्या गात्रागात्रावर धरावी । तबल्याच्या प्रत्येक थापेसम माझ्या दुःखावरली खपली निघावी । तारेतल्या झरझर चढणाऱ्या तानेप्रमाणे माझी जखम भळभळावी । अन मग प्रत्येक सुखदायी आलापासह माझ्या नेत्रांवर झडप बसावी । खर्जातून तारेत जाणाऱ्या त्या स्वरासम माझी अवस्था व्हावी । दुःखाच्या काळोखात बुडता बुडता सुखाची परमोच्च परमावधी गाठावी । शब्दांना स्वरांची, स्वरांना लयेची, लयेला तालाची अन त्या सगळ्यांना माझी भाषा समजावी । दुःख, आनंद , विरह, समाधानाने मिश्रित ती मैफिल सजावी । माझ्या आकारविकारांची समाधी लागवयास अवकाश की, मैफिलीतली भैरवीसाठी शेवटची टाळी वाजावी । आणि अर्धवट नशेत झिंगलेल्या मला पुढच्या मैफिलीची अन तुम्हाला प्रज्ञेचा पुढच्या लेखाची हुरहूर लागावी । - प्रज्ञा जोशी